गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात सर्वत्र शिवदूत स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेनेच्या बुथ प्रमुख आणि प्रत्येक बुथ वर नेमण्यात आलेले दोन शिवदूत यांना याप्रसंगी भेटवस्तू देऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. मंठा तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. यास्नेह मेळाव्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून सर्व शिवदूत आणि बूथ प्रमुख उपस्थतीत होते. यावेळी त्यांना भेटवस्तू देण्यात आली व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी शिवदूतांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात संघटना बांधणीवर काम करण्यासाठी या शिवदूतांची नेमणुक केलेली आहे. शिंदे सरकारने केलेल्या विकासकामांची तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोहचावी तसेच ग्रामीण किंवा शहरी भागातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लगाव्या, भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी पक्ष्याचे काम अधिक ताकदीने व्हावे ही जबाबदारी शिवदूतांची आहे.संघटना जेवढी मजबूत होईल तेवढीच आपली ताकद येणाऱ्या निवडणुकांत वाढेल म्हणून सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.मंठा तालुक्यात उदयसिंह बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अत्यंत उत्साहात चांगल्याप्रकारे चालू आहे असे कौतुक सुध्दा त्यांनी केले.शिवसेनेकडे येणाऱ्या काळात उदयसिंह बोराडे हे एकमेव तरुण नेतृत्व तालुक्यातून आहे.जनतेसमोर चांगला पर्याय म्हणून ते पुढे जात आहेत त्यांच्या माघे ठामपणे उभे राहण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखांनी केल्या. येणाऱ्या काळात शिवसेनेचा झंजावात निर्माण करा असे आवाहन उदयसिंह बोराडे यांनी याप्रसंगी शिवदूतांना केले. यावेळी जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल, मा.सभापती प्रल्हादराव बोराडे,संचालक पंजाबराव केंधळे, गजानन अवचार,गजानन कापसे,विलास राठोड,दीपक गायकवाड,दिलीपराव हिवाळे, चांदभाई पठाण,ॲड.रजेशजी खरात, लिंबजी बोराडे,विजय चव्हाण,रामराव वरकड,विलासराव शिंदे,दत्तराव सरकटे,बंडूभाऊ बोराडे,संदेश चव्हाल,माऊली वायाल,शरद काकडे,गजानन सवणे,विवेक भुतेकर,सुनील गुंड,शुभम गुंड,वैभव थोरात,शरद डोईफोडे,साजिद पठाण,सोमनाथ शेळके,सुनील शेळके,पवान खरात,तुकाराम तांगडे,विष्णू मोरे,विनोद खरात,दत्ता खरात,बाळासाहेब घोरसड,दत्तराव वाघमारे,कैलास बनकर,अर्जुन राठोड,दीपक वैद्य,भारत वैद्य,सईद रहीम,रविराज खजुरे,अभी जनकवर,रुद्राक्ष उबाळे,महादेव वायसे,योगेश गडदे,दिनेश चव्हाण,समाधान शेवाळे,विकास राठोड,सुरेश चव्हाण,गणेश बोराडे,अंगद मोरे व शेकडो शिवसैनिक