सर्व सेवा ..

Khozmaster
1 Min Read
पायी  चालता वारी
सेवा घडते कायिक
गाते अभंग  जिव्हा
सेवा घडते  वाचिक
विठ्ठलविठ्ठल अंतरी
सेवा घडे  मानसिक
जीव शिव  एक रुप
समाधान  आत्मिक
घडे  उपवास  खास
सेवा घडते सात्विक
विसरे सारे भेदभाव
सेवा  घडे भावनिक
पदर मोड  करताना
सेवा घडते आर्थिक
रे सेवा वारक -यांची
पुण्य जोडे  भाविक
दुकानसजे मदतीले
रे सेवाव्यावसायिक
नियमांने बांधीलकी
भान ठेवे सामाजिक
हरिवीण काही नाही
पंढरी मना स्थायिक
पांडुरंग नसा नसात
विठूरायाचे  पायिक

 हेमंत मुसरीफ पुणे
  9730306996..
0 9 4 7 7 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *