प्रतिनिधी रामेश्वर वाढी
मनुष्य सरासरी जीवन जगताना विविध क्षेत्रांमध्ये वावरतो त्या क्षेत्रामध्ये तो अधिकाधिक प्रगती करतो मात्र प्रेमाशिवाय जीवन मनुष्य पूर्णता आनंदी होत नाही किंतु मित्रत्व हे असे एक नाते आहे की हे नाते निस्वार्थ भावनेने निरागस मन यामध्ये जोडले जाते आणि तोच आनंद माणसाला मिळाला की त्याचे जीवनात जीवन सफल होते असाच मित्रत्वाचा मिलनाचा कार्यक्रम तब्बल 40 वर्षानंतर घडून आला
1983 व 1985 माजी विद्यार्थ्यांचा मेळावा अर्थात गेट-टुगेदर कार्यक्रम दिनांक 19 11 2023 ला पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे मोठ्या थाटामाटात पार पाडला .
सर्वप्रथम गणेश मोकळकर व शिवाजी बंड व पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग प्रमुख डॉक्टर शेषराव चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री साईबाबा यांचे प्रतिमेचे पूजन व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे संचालन जनार्दन फुलारी यांनी केले व प्रास्ताविक सूर्यकांत उर्फ छोटू जोशी यांनी केले.तर आभार प्रदर्शन रजनीकांत बनसोड यांनी केले
कार्यक्रमांमध्ये सर्व माजी विद्यार्थी सध्या काय करत आहेत व त्यांच्या कुटुंबातील मुलं बाळ पत्नी यांच्या यांच्यावरील माहिती विषयावर सर्व परिचय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम अगदी सुंदर झाला सकाळी दहा वाजता नाश्ता चहापाणी ,दुपारी दोन वाजता जेवण ,कविता,गीत गायन व चर्चासत्र अशी कार्यक्रमाची दिवसभर रेलचेल होती .
यानिमित्ताने जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. प्रत्येक विद्यार्थी आज मोठमोठ्या हुद्यावर तर कोणी व्यापारी कोणी शेतकरी असे वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक असून सुद्धा सध्या 2023 सुरू असून आम्ही सर्वजण 1983 मध्ये जसे वागत होतो तसेच आज आम्हाला त्याचा अनुभव आला. ते जुने वागणे सर्वांचे आढळून आले त्यातील कोणीही असं दाखवलं नाही की मी वेगळा आहो ….
कार्यक्रमांमध्ये आमच्या सोबत शिकलेले विद्यार्थी श्रीकुमार गुलालकरी, रमेश राऊत ,लक्ष्मी इंगळे ही मंडळी आज आमच्यात नाही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रजनीकांत बनसोड, भोजराज बायस, पांडुरंग गरजे, जनार्दन फुलारी ,अजय धरमकर मधुकर सुरवाडे ,वासुदेव गोतरकार, दिलीप ठाकूर, विजय निमकंडे ,प्रकाश इंगळे असे सर्वांनी खूप परिश्रम घेतले..
पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग प्रमुख डॉक्टर शेषराव चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिला होता या सर्वांचे सुद्धा आभार यावेळी व्यक्त करण्यात आले
Users Today : 16