अवकाळी ..

Khozmaster
0 Min Read
अवकाळी ..
ही हवा पावसाळी
पाऊस  अवकाळी
गार पीट  गारठली
थिजते आईकाळी
सातबारा दुर्दैवाचा
लिहिलेला कपाळी
आरडाओरड पुन्हा
बोंब कानीकपाळी
संकटा मागे संकट
आपत्तीची ये टोळी
दातृत्ववृत्ती ज्याची
हाती  त्याचे झोळी
येतो घास  तोंडाशी
पुनःभुके कवटाळी
निसर्ग का  कोपला
करी  कोण कुटाळी
खरे  सुरु  करायची
कामे सारे  उन्हाळी
दुरुस्त करतो आता
कशीअशी पन्हाळी
पंचनाम्यात  फसली
समस्तमंडळी भोळी
ते सुदैव हरवले  कुठे
दुर्दैवसदैव का भाळी
0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *