प्रविण चव्हाण
नंदुरबार : जिल्हा कोषागार नंदुरबार कार्यालयाच्या अधिनस्त असलेले सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी तसेच त्यांच्या आस्थापनेवरील एनपीएस सभासदांसाठी केंद्र शासनाच्या पीएफआरडीए यांच्याकडील अधिकाऱ्यांमार्फत 14 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी वि. जं. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण व राज्य अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या सुचनेनुसार हे प्रशिक्षण घेण्यात येत असून या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
|
ReplyForward
|
Users Today : 51