पोल .. ओपिनियन पोलचे
धक्कादायक ते सर्वे
अचूक असे अंदाज
सांगत फिरतात गर्वे
पध्दतहवी शास्त्रोक्त
रे निष्पक्ष हवेत दावे
पाया नसताभक्कम
नकोत ते हवेत दावे
गल्ले भरु ना निर्णय
वाढवणारे हेवे दावे
तराजू हवा समतोल
रे नसावे उजवे डावे
भरकटलेल्या पक्षास
रे आपली जागा दावे
भाकीत करा चकीत
काय उजळणार दिवे
आपलेनिर्णय तसेचं
दुस-यावरती लादावे
अशक्य होईलं शक्य
चलं चक्रव्यूह भेदावे
हा न अंतीम निकाल
सुवर्ण मध्या साधावे
चुके कुठे समीकरण
उत्तर नक्की शोधावे
Users Today : 14