शिवमुद्रा… स्वराज्यसुरक्षेसाठी
सागरी महत्व काय
तटबंदी भक्कम हो
जाणे राजे शिवराय
चोरट्यामार्गाने श ..
ठेवू शकतात पाय
आज पटतेयं महत्व
छत्रपतीची ती राय
आरमार हवे तत्पर
हाच चांगला उपाय
मावळे ठेविले दक्ष
नको कुठला अपाय
दाणादाणदुश्मनांची
दे माय धरणी ठाय
आठवण होई सार्थ
विक्रांता करता हाय
स्वदेशी भक्ती सिध्द
नौदल सक्षम कराय
ख-याअर्थाने स्वतंत्र
रे झाली भारत माय
नौकादल ध्वजावरी
ठसा ठसले शिवराय
कुर्निसात शिवबाला
जगत हे गोडवे गाय
Users Today : 9