ऑलवेल ..

Khozmaster
1 Min Read
निवडणूक  निकाल
आगळी पाडे  छाप
कुणास जोरात यश
कुणा सुफडा  साफ
जिंकणारे खुशीमधे
सारे  झाले टिपटाॅप
जनतेचा कौल छान
समोरचे  होई फ्लाॅप
ई व्ही एम मशीनला
ना यंदा  शिव्याशाप
आरोपीच्या पिंज-या
ना  झाला  मनस्ताप
यंदाला सगळे सरळ
नाहीकाही उपद्व्याप
धन शक्ती  गैर वापर
दिसले  नाही  प्रताप
झुंडशाही  कुठे नाही
गुंडाशी नसे  मिलाफ
आरडा ओरडा नाही
नेहमीचा तो आलाप
टिकास्त्रे उगारली ना
अफवा ब्लाप  ब्लाप
रे कुणीही कुणाचाही
काढला ना  मायबाप
सगळेकाही ऑलवेल
घडले न मुळीचं पाप
भाकरी फिरली बुवा
पदरात  चांगलं  माप
0 9 4 7 6 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *