अधिवेशनाच्या पूर्वी
आयोजित चहा पान
चालतआलेली नेहमी
पूर्वीपासून प्रथा छान
विरोधक न् सत्ताधारी
तलवारींना एक म्यान
महत्वाचा सद्हेतू हा
प्रथेचासांभाळा म्यान
साधा समन्वयनिमित्ते
खुला आखाडा मैदान
लढाई आधीचा करार
सैन्य दोन्ही सावधान
संधीमिळाली चांगली
ठेवा सार्थक अवधान
व्याही व्याही विवाही
एकत्र दोन्हीखानदान
संसद हे संवाद भवन
लोक शाही सर्वोत्तम
बनवावी सामर्थ्यवान
चालते प्रथा नेहमीची
बहिष्कृत हा चहापान
पक्ष असो ते कुठलेही
विसरतात दोन्ही भान
Users Today : 9