तत्वज्ञान …

Khozmaster
1 Min Read
खुणवत राहे सर्वां
लेज  कुरकरे  पुडे
शरणागती  पत्करे
रे आपण भुके पुढे
गच्च हवा भरलेली
आंत दोतीन तुकडे
ओम् फस्स्  स्वाहा
कळेन काय लफडे
पडके फडाड् फोडे
उत्साहानी रे केवढे
हवा निघते सगळी
हिरमोड करे लुकडे
आकर्षक दिसेकसे
गोजिरे  छान रुपडे
भुलले वरलियारंगा
भुकेले आपण  वेडे
सांगतात तत्वज्ञान
तुकडे आतले थोडे
फसवे किती जगत्
खेचते आपणां कडे
सांभाळ बा ग्राहकां
मृगजळ सगळीकडे
सरळ आहो बिचारे
रस्ते विचीत्र वाकडे

खुणवत राहे सर्वां

लेज  कुरकरे  पुडे
शरणागती  पत्करे
रे आपण भुके पुढे
गच्च हवा भरलेली
आंत दोतीन तुकडे
ओम् फस्स्  स्वाहा
कळेन काय लफडे
पडके फडाड् फोडे
उत्साहानी रे केवढे
हवा निघते सगळी
हिरमोड करे लुकडे
आकर्षक दिसेकसे
गोजिरे  छान रुपडे
भुलले वरलियारंगा
भुकेले आपण  वेडे
सांगतात तत्वज्ञान
तुकडे आतले थोडे
फसवे किती जगत्
खेचते आपणां कडे
सांभाळ बा ग्राहकां
मृगजळ सगळीकडे
सरळ आहो बिचारे
रस्ते विचीत्र वाकडे
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *