रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मभूषण खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने आज ‘कर्मवीर रयत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. हडपसरमधील एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे करण्यात आले होते. संस्थेच्या पश्चिम भागातील सर्व सिनिअर महाविद्यालये, ज्युनिअर महाविद्यालये, शाळा आणि साधना शैक्षणिक संकुलातील सुमारे १७३९७ विद्यार्थ्यांनी ‘रन फॉर ग्रीन टुमारो’ ही थीम घेऊन स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेची सुरुवात एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणातून झाली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एस. एम.जोशी महाविद्यालयातील इनडोअर हॉलमध्ये संपन्न झाला. यानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी ‘जीवन हीच एक स्पर्धा आहे ती प्रत्येकाने यशस्वी पद्धतीने पार पाडायची असते. त्यामुळे नेहमी खिलाडूवृत्ती ठेवून पुढे जा’ असे सांगितले.
या स्पर्धेसाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नामदार अजितदादा पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख IAS (Rtd.), नोबल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.दिलीप माने, राष्ट्रीय विकास केंद्राचे सचिव निरंजन केळशीकर व भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे चेअरमन भगवानराव बेंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
उदघाटन प्रसंगी उद्घाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Rtd.), रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.राम कांडगे, उद्योजक व आर्यनमन सायकलपटू दशरथ जाधव, सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय खेळाडू (खो-खो) शीतल वाघ, आर्यनमन शंतनू जगदाळे, लेफ्टनंट कर्नल दारा सिंह चहल , नायब सुभेदार रराहुल,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्यअरविंद तुपे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे, पश्चिम विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुदाम शिंदे व वडगाव मावळ स्कूल कमिटीचे सदस्य मनोज ढोरे, पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक अधिकारी शंकर पवार, हे उपस्थित होते.
Users Today : 36