ख्रिस्ती समाज बांधवांच्या प्रार्थनेसाठी चर्च बांधून मिळावे, ही समाज बांधवांची मागणी होती.

Khozmaster
1 Min Read
कागलमध्ये ख्रिस्ती धर्मांच्या समाज बांधवांसाठी सुंदर असे चर्च ऊभारू,अशी ग्वाही दिली.कागलमध्ये काल नाताळनिमित्त ख्रिस्ती धर्माच्या समाजबांधवांच्या मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त केले.ख्रिस्ती समाज बांधवांच्या प्रार्थनेसाठी चर्च बांधून मिळावे, ही समाज बांधवांची मागणी होती. परंतु; जागेची अडचण होती. स्वतःहून जागा विकत घेऊन चर्च बांधून देऊ असे सांगितले.
येथील न्यू लाईफ फेलोशिप चर्चच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संस्थापक येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेला ख्रिस्ती धर्म जगात सर्वात मोठा धर्म आहे. या धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांना अनंत यातना सोसाव्या लागल्या. प्रचंड सहिष्णुता ही या धर्माची शिकवण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताना सुळावर चढवून त्यांच्या शरीरात खिळे ठोकणाऱ्यानाही त्यांनी “परमेश्वरा, त्यांना माफ कर. कारण; ते काय करत आहेत हे त्याना समजत नाही,” अशी दयेची प्रार्थना केली.
यावेळी माझ्या हस्ते विधवा माता-भगिनींना साड्यांचे वाटप व शाळकरी मुलांना कपड्यांचे वाटप झाले. कार्यक्रमात पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल समाज बांधवांच्या हस्ते माझा सत्कार झाला. माझ्याकडूनही समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *