गुरु चरित्रम् ..
गुरु चरित्र कामधेनू
सुखे संतोष ऐहिक
गुरु चरित्र कल्पतरू
शांतता पारलौकिक
बावन्नअध्याय अमृत
रांजणात अलौकिक
अवतरणिके साठले
कथा सार सामुहिक
पारायण करा कुणी
प्रतिपाळा सांसारिक
नित्य कर्म करू शके
कर्तव्यात व्यवहारिक
एकटा करी पारायण
वापठण सामुदायिक
श्रवण करा तेचं पुण्य
समाधान रे मानसिक
सुचिर्भूती तना मनात
एकाग्रता ती कायिक
शक्यतितके नियमात
परमानंद दे आत्मिक
चित्तात येई विरागता
आचरण बने सात्विक
वाणी मधुकोष विनय
तनमन शुध्दी मौलिक
Users Today : 51