उल्हासनगर संजीव भांबोरे. आंबेडकर नगर पंचशील मित्र मंडळ कुर्ला कॅम्प उल्हासनगर ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू संजीव क्षेत्रे यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या उल्हासनगर युवा जिल्हाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे .ही नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे .सोनू क्षेत्रे हे आंबेडकरी चळवळीत कार्यरत असून यांनी अनेक आश्रमातील विद्यार्थ्यांना भेटून विद्यार्थ्यांना वही ,पुस्तके ,अन्नधान्य वाटप करण्याचे काम करीत असतात. आणि ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात .त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान. रक्तदान शिबिर व अन्य अत्याचाराचा आवाज उठवण्याचे काम करीत असतात .त्यांच्या निवडीचे चाहत्यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेले आहेत.
Users Today : 1