प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.सदर प्रकरण हे पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत येत असून फिर्यादी द्वारा दिल्या गेलेल्या रिपोर्टवरून विधी संघर्षग्रस्त बालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी ही एक मुलगी वय ९वर्ष व मुलगा वय ५ वर्ष शेतमजुरी करून आपल्या परिवारासह राहतात. विधीग्रस्त बालक वय १७ वर्ष हा फिर्यादीच्या घरच्या समोरच्या बाजूलाच राहतो. त्याला फिर्यादी मागील १० वर्षापासून ओळखते. दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादीच्या लहान मुलाने फिर्यादीला सांगितले की विधी संघर्षगस्त बालकाने फिर्यादीच्या मुलीशी जबरदस्तीने संभोग केला. “तुला कसे माहिती?” असे फिर्यादीने विचारले असता फिर्यादीचा भासरा वय ६ वर्ष याने सांगितल्याचे सांगितले. याबाबत फिर्यादीने आपल्या पिढीत मुलीला विचारणा केली असता, तिने सांगितले की दिनांक २३ डिसेंबर २०२३ च्या दुपारी १२ ते १ च्या दरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी आणि फिर्यादीचा भासरा सायकलने गायीच्या झोपड्याकडे जात होते, तेव्हा विधी संघर्ष बालक पीडित मुलीच्या पाठीमागे आला. फिर्यादीचा भासरा गायीच्या झोपड्यात गेला म्हणून पीडित मुलगी पण त्याच्या पाठीमागे झोपड्यात गेली. तेव्हा विधी संघर्ष बालक पण त्यांच्या पाठीमागे आला व कुत्र्याला खेळवू लागला. पीडित मुलीने संघर्ष ग्रस्त बालकास “तू कशासाठी आला?” ही विचारणे केली असता “मग सांगतो” असे म्हणत फिर्यादीच्या भासऱ्याला कुत्र्याला घेऊन बाहेर पाठविले. त्यानंतर विधी संघर्ष बालकाने फिर्यादीच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे पीडित मुलीने फिर्यादीस सांगितले.
याप्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे विधी संघर्षग्रस्त बालका विरुद्ध ३७६(अ),(ब),३७६(२)(फ),३७६(२)(जे ),३७६(२)(एन) भा.दं.वि. सहकलम ४,८,१० बालकाचे लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, सीमा बेंद्रे ह्या करीत आहेत.