*धरमपेठ झोनचे भ्रष्टाचारी सहायक आयुक्तांच निलंबन करा

Khozmaster
1 Min Read
शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली नागपूर मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन केली मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराध्यक्ष मा.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री.अभिजित चौधरी यांची दि.28/12/2023 ला 5 वाजता भेट घेण्यात आली. नागपूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या, कर आकारणी, फुटपाथवरील अतिक्रमण, पार्किंग समस्या, निकृष्ट रस्ते बांधकाम, सामान्य जनतेच्या घरावर अतिक्रमनाच्या नावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई, सोबतच धरमपेठ झोन येथील अधिकारी फेरीवाल्यानं कडून हफ्ता घेतात, अनधिकृत बांधकामाला आश्रय देतात, फुटपाथवरील दुकानदार कडून 500 रुपये हफ्ता वसुल करतात याचे प्रमुख कारण असलेले धरमपेठ झोन मधील भ्रष्टाचारी सहायक आयुक्त यांच निलंबन तात्काळ करावे अश्या अनेक मुद्यावर आयुक्तांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
निवेदन देतांना शहराध्यक्ष अध्यक्ष प्रशांत, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश संघटक सचिव हाजी सोहेल पटेल, माजी नगरसेवक राजेश माटे, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष अरविंद ढेंगरे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वसीम अन्सारी, उत्तर नागपूर अध्यक्ष राकेश बोरीकर, मुमताज बाजी, अखतर हुसेन, बबलू पठाण, अलताफ हुसेन, रमजान अन्सारी, जावेद अन्सारी, शमी सिद्दकी, मोहम्मद इमरान, इरफान सिद्दिकी, निसार ताजी, किरण खिरडसे व इतर उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *