आज दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा शहरातील डॉ.डी.सी गुप्ता नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०४ येथे शिक्षण विभाग पंचायत समिती बुलढाणा व नगर परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२३ रोजी *बुलढाणा तालुका विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रदर्शनीचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचेहस्ते फीत कापून करण्यात आले*, त्यानंतर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनीला युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह मान्यवर मंडळींनी भेट दिली, यावेळी त्या ठिकाणी सोबत शिक्षणाधिकारी श्री अनिल अकाळ, उपशिक्षणाधिकारी श्री अनिल देवकर, शिक्षणाधिकारी श्री बी आर खरात,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुरडकर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती वृंदा कुलकर्णी, प्रशासन अधिकारी श्री संजय जाधव, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, दीपक तुपकर विजय काळवाघे, मुख्य समन्वयक प्रा.राहुल हिवाळे, विलास चव्हाण,यांच्यासह शिक्षण विभाग पंचायत समितीचे तसेच नगरपरिषद बुलढाणाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होते…!