अतुल्य भारत…!
तेजोमय संस्कृतीचा वारसा लाभलेला आपला भारत. अखंड एकनिष्ठ भारत… निमित्त अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचं आगमन…! अयोध्या विविधरूपाने सजत आहे. त्यातील एक म्हणजे अयोध्या विमानतळ…सुसज्य असं विमानतळ आणि अयोध्येला संपूर्ण जगाशी जोडू पाहणारे अनेक प्रकल्प लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 30 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच आज अयोध्येत उपस्थित राहणार असून, भव्य स्वरुपातील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.अयोध्या विमानतळाचे ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असं नामकरण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रामराज्याची प्रत्येक झलक या विमानतळावर दाखवण्यात आली आहे. भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणाऱ्या भिंती सजलेल्या आहेत. डोळ्याचं पारणं फेडणारा हा आणि असे असंख्य क्षण येत्या २२ जानेवारी पर्यंत ‘याची देही याची डोळा’ आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा आनंद आहे .