कोवीड ..
नव्या नव्या रुपांतून
डोकवू पाहे कोवीड
फसले जरी कित्येक
ते प्राणायाम द्रवीड
मूळातूनि उपटूनही
कुठून उद्भवते कीड
रक्त पिपासित वृत्ती
चिकटू पाहे गोचीड
दोष देणे अतिआता
उगा फोल चीडचीड
तुम्ही संकटयजमान
पुन्हा नको तिडतीड
फुकट सल्ले पाजळे
अर्धवट शहाणे दीड
खूप लढवले किल्ले
झाले सगळे निर्भीड
शिकवले अनुभवाने
पुरेशी चेपलीयं भीड
आरिष्ट करे धारिष्ट्य
पुनश्च भक्कम भीड
प्रयास ना दिशाहीन
दणकट बांधले शीड
जुनरोगा नव इलाज
टळो कायम ईडपीड
–हेमंत मुसरीफ पुणे.
Users Today : 39