वृद्ध कलावंताच्या मानधन वाढीकरीता विदर्भ लोककलावंत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन.”

Khozmaster
4 Min Read

येत्या 24 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्यातील लोककलावंताचे विराट स्वरूपाचे क्रांतिकारी धरणे आंदोलन होणार. कलावंताच्या न्यायहक्कासाठी कलावंतानी (राजकारण न करता) गटतट किंवा मतभेद मनभेद विसरून एकजुटीने सहभागी व्हावे. -लोककलावंत संजय कडोळे यांचे आवाहन. “वाशिम” : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून “वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन” योजनेमार्फत दिले जाणारे मानधन हे आजच्या प्रचंड वाढत्या महागाईच्या काळात,अत्यंत नगण्य किंवा तुटपुंजे आहे.त्यामध्ये शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची आयुष्यभर जनजागृती व समाजातील व्यसनमुक्ती करणाऱ्या वयोवृद्ध तसेच दुर्धर आजारग्रस्त लोककलावंताचा उदरनिर्वाह आणि औषधोपचार होऊच शकत नाही.याची जाणीव ठेवून शासनाने येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करून दरमहा सरसकट किमान पाच हजार रुपये मानधन करावे.गेल्या इ. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकापासून बरखास्त करण्यात आलेल्या शासकिय निमशासकिय समित्याची पुनर्रचना करून, १) समाज कल्याण जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या “जिल्हा निवड वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थी निवड समिती” स्थापन करावी ; २) पालकमंत्र्यांद्वारे गठीत केल्या जाणाऱ्या “जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थी निवड समितीवर” कोणत्याही राजकिय पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याची निमशासकिय सदस्य म्हणून निवड न करता फक्त आणि फक्त हाडाच्या लोककलावंताच्याच नियुक्त्या करण्यात याव्यात ; ३) गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेले कलावंत लाभार्थ्यांचे मानधन करीता करण्यात आलेले सर्वच अर्ज निकाली काढून गरजूंना तात्काळ मानधन सुरू करावे ; ४) मृतक कलावंताच्या वारसदारांची नोंद घेऊन त्यांना वारसाहक्काने तात्काळ मानधन सुरू करण्यात यावे.तद्वतच गेल्या अनेक महिने किंवा वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेकडो कलावंताच्या वारसदारांना तात्काळ मानधन सुरू करण्यात यावे.इत्यादी रास्त मागण्या अनेकवेळा निवेदनाद्वारे सादर करूनही शासन स्तरावर दखलच घेतल्या जात नसल्याने, जिल्ह्यातील वयोवृद्ध लोककलावंत कलाकारामध्ये प्रचंड नाराजीचा सूर असून, आता कलावंत संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येत्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात कलावंताच्या मागण्या मंत्रालय स्तरावरून माननिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,सांस्कृतिक मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी पूर्ण कराव्यात.आणि त्याकरीता येत्या २४ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत,जिल्हयातील लोककलावंत शांती,संयम आणि अहिंसेच्या वैधानिक मार्गाने, “क्रांतिकारी धरणे आंदोलन” करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यामार्फत, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे,परिवर्तन कला महासंघ वाशिमचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खंदारे,मंगरूळपीर येथील कलावंत राजाराम पाटील राऊत, लक्ष्मणराव इंगळे,लक्ष्मण फुके, गजानन वाडेकर, भिकाराम जगताप,अंबादास राऊत, रमेश गावंडे, पंजाबराव सुर्वे, मुकूंदा दाते, सौ रेखाताई टोपले, छायाताई राऊत, सौ ललिताबाई राऊत, श्रीमती अनिता राजुरकर, श्रीमती पुष्पाबाई वाघ, सौ लक्ष्मीताई पायंडे, सौ दुर्गाबाई गीरे, श्रीमती लक्ष्मीबाई चव्हाण, सर्व कलावंत मंगरुळपीर, सुखदेव कोते, लोमेश पाटील चौधरी, सौ तुळसाबाई चौधरी मानोरा,कारंजा येथील सर्व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार प्राप्त रामबकस डेंडूळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिवमंगलआप्पा राऊत, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश गवळीकर, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रदिप वानखडे,उमेश अनसाने,अभा मराठी नाट्य परिषदेचे अश्विन जगताप, अभा मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे नंदकिशोर कव्हळकर, माणिकराव हांडे,उमेश अनासाने, विजय खंडार,गोंधळी कलाकार सुरेश हांडे, आदर्श जय भारत संस्था तथा ईरो फिल्मस एन्टरटेन्टमेन्टचे संचालक डॉ इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया,डॉ ज्ञानेश्वर गरड, कामाक्षा मित्र मंडळाचे रोहीत महाजन,गुलाब पापडे,निळकंठ काळे,गोंधळी कलावंत गोपाल मुदगल,कैलास हांडे, प्रतिक हांडे, हभप अजाब महाराज ढळे, गोपाल महाराज ठिलोरकर, हभप विनायक महाराज गुंजाटे,शेषराव पाटील इंगोले,श्रीमती कांताबाई लोखंडे, सौ इंद्रकलाबाई मात्रे, शंकर ढळे, सौ सरलाबाई इंगोले, सौ छायाताई गावंडे, सौ अन्नपूर्णा लोखंडे,श्रीमती देवकाबाई इंगोले,बाळकृष्णा काळे यांनी दिले आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे संघटनेचे अध्यक्ष संजय कडाळे यांनी जिल्ह्यातील कलावंताना, “कोणत्याही लोककलावंताने राजकारण न करता, जिल्हयातील सर्वच कलावंताच्या संघटनांनी कलावंताचे न्याय्य हक्काच्या रास्त मागण्यांच्या पूर्ततेकरीता,आपआपसातील मतभेद,मनभेद,पक्षभेद विसरून एकजुटीने कलावंताच्या क्रांतिकारी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे विनम्र आवाहन केले आहे.

0 9 3 7 0 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *