शहा येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतील व अन्य कामाचे भूमिपूजन संपन्न

Khozmaster
2 Min Read

जिल्हा वाशिम कारंजा लाड जिनवर तायडे
कारंजा – दिनांक 7 जानेवारी 2024रोजी कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी दिलेले शहा ता.कारंजा येथे स्थानीक विकास निधीतून संताजी महाराज संस्थान परिसरात ग्राम पंचायत मालकीच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 15 लक्ष रूपये , आणि 2515 अंतर्गत दिगंबर काटोले यांचे घर ते भवानी मंदीरपर्यंत सिमेंट रस्ता करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रूपये या कामाचे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.सूरेश गिरमकार,सौ .वैशाली विजय काळे पंचायत समिती सदस्या,सरपंच सौ.छायाताई चंद्रशेखर काटोले,सार्वजानिक बांधकाम विभाग अधिकारी माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विस्तारक लोकसभा सुनील घोटकर , अनिल कृष्णराव कानकिरड, राजीव आकातराव भेंडे,गणेश ठाकरे,विजय गणेशराव काळे, राहुलभाऊ रविराव, रामकिसन चव्हान,मंगेश धाणे, चंद्रशेखर काटोले,संजय भेंडे, मतदार संघ विस्तारक विलास कवाने, संकेत नाखले, शुभम बोनके, अक्षय देशमुख, संदीप काळे, अशोक रोकडे आदी मंडळी कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थीत होती. सरपंच, उप सरपंच , ग्राम पंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनात माजी पंचायत समिति सदस्य सुरेश गिरमकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी यांच्या घरघुती कार्यक्रमांत वरील सर्व मान्यवर उपस्थित होते.गजानन लकडे माजी सरपंच, निलेश घोडेस्वार ग्रा. पं. सदस्य, संदीप पाटील उप सरपंच ,अक्षय लकडे ग्रा प स, मेघा चेतन मोटे ग्राम पंचायत सदस्य, वंदना क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य, चंदाबाई शिंदे ग्राम पंचायत सदस्य, शेखर काटोले माजी सरपंच, पत्रकार जिनवर तायडे, प्रमोद काशीकर, वसंता तिडके इत्यादी सह गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सारंग पाटील यांनी केले. कार्यक्रम प्रास्तविक सुरेश गिरमकार यांनी केले असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्विय सहाय्यक यांनी कळविले.

0 9 3 7 0 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *