गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावा यासाठी आनंद मेळावा महत्त्वाचा-प्रल्हादराव बोराडे मंठा : येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये बुधवार दि.३१ रोजी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आनंद मेळावा घेण्यात आला. यानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घरून जिलेबी, खमंग ढोकळे, कचोरी, भाकरी ठेचा, दाबेली, बासुंदी, चना मसाला, बोरकुट, व इतर चविष्ट खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी आणले होते.
येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळाव्यात सोमवारी विद्यार्थ्यांनी चाळीस स्टॉलमध्ये विविध खाद्यपदार्थांची विक्री केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार कसा करावा, व्यापार कसा करावा या गोष्टीचे ज्ञान झाले. पालक, शिक्षक, नागरिकांनी आनंद मेळाव्याला भेट देऊन विद्यार्थ्याकडील खाद्यपदार्थांची खरेदी केली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना नेते मा सभापती प्रल्हादराव बोराडे, यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उदघाटन झाले तर प्रमुख उपसथितीमध्ये माणिकराव थिटे, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग खराबे, व कार्यक्रमास उपस्थित , अझर भाई. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक दिपक मूर्तडकर, दिनेश राठोड, दिपाली चिंचोलकर, कमल अंभुरे, सोनाली चिंचोलकर, दिपाली कदम, रंजना यादव, वंदना कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 48