खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले

Khozmaster
1 Min Read

नांदेड – शहरानजीक पावडे वाडी भागात निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात मशीन गनचे ३९१ राऊंड सापडले. ही घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

पावडे वाडी ते गुरुजी चौक रस्त्यावर एका निर्जन परिसरात एक शेतमजूर मोहोळ झाडण्यासाठी गेला असताना कालव्यात त्याला गोळ्या असलेले दोन पट्टे आढळले.

कुतूहलापोटी त्याने हे पट्टे घरी नेले. त्याच्या वडिलांना संशय आल्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे फोटो काढून पाठवले.

पोलीस कर्मचाऱ्याने लगेच ही बाब वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे राऊंड जप्त करण्यात आले आहेत. हे राऊंड अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडून असल्याने गांजले होते.दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे

0 9 4 5 5 2
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *