सुनील पाचपोर यांची टेनिस क्रिकेट जिल्हा प्रमुख पदी निवड

KHOZ MASTER
1 Min Read
प्रतिनिधी – शिवानंद पवार – युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन बुलढाणा जिल्हा प्रमुख पदी श्री सुनील पाचपोर यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड स्टेअर्स फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष श्री उपाध्याय सर, इंडिया स्पोर्ट्स जनरल मॅनेजर श्री मिश्रा सर तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री बालाजी जोगदंड , महाराष्ट्र चीफ स्पोर्ट्स को_ ऑर्डिनेटर श्री सुनील शिंदे सर या सर्वांनी मिळून केलेली आहे. त्यांची  खेळाप्रती असणारी आवड , टेनिस क्रिकेट चे योगदान पाहता त्यांची ही निवड करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये विविध खेळाचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून जिल्ह्यातील सर्व तळागाळातील खेळाडूंना याचा फायदा होनार आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन श्री सुनील पाचपोर यांनी केले आहे.. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे..
0 9 7 1 5 8
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *