सिं. राजात कंद्रीयमंत्री ना. जाधव यांचा नागरी सत्कार नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Khozmaster
1 Min Read

सिंदखेडराजा : येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा भव्य नागरी सत्कारांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव यांची केंद्रीय राज्यमंत्री आयुष स्वातंत्र्य पदभार आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरात येत असून यानिमित्त शहरातील मातोश्री मंगल लॉन्स येथे सकाळी ११ वाजता महायुतीच्यावतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व सौ. राजश्री प्रतापराव जाधव सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार समारंभ अध्यक्ष म्हणून आ. डॉ. राजेंद्र शिंगणे प्रमुख उपस्थितीमध्ये आ. डॉ. संजय कुटे विशेष उपस्थितीमध्ये माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आ. तोतारामजी कायंदे तर प्रमुख उपस्थित  होते. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, रामप्रसाद शेळके, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रा. बळीराम मापारी, मनसे जिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव, कवाडे गट जिल्हाध्यक्ष विजय गवई, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवळी यांची उपस्थिती राहणार आहे. सिंदखेड राजा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी नागरिक सत्कारासाठी उपस्थित राहण्याच्या आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *