बाप्पा विराजमान असलेल्या दुचाकीने भररस्त्यात घेतला पेट, कुटुंबाचा उडाला गोंधळ

Khozmaster
1 Min Read

बाप्पाला घरी घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. भर रस्त्यात धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीने घेतल्याने रस्तावर एकच गोंधळ उडाला.

गणरायाचे राज्यात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. अनेकांची बाप्पाची मुहूर्तावर मूर्तीस्थापन करण्यासाठी एकच लगबग सुरु झाली आहे. सोलापूरात मात्र गणरायांच्या उत्सवाच्या दिवशी एक अपघात घडला. लाडक्या बाप्पाला घेऊन जात असताना धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला आहे. दुचाकी चालकाच्या वेळेत लक्षात आल्यावर, दुचाकी थांबवून बाजूला थांबवण्यात आली. बघता बघता इलेक्ट्रिक वाहनाने अचानक जास्त पेट घेतला. जाग्यावर जळून दुचाकी खाक झाली. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटनेनंतर दुचाकी चालकाने पोलीस प्रशासना आणि अग्निशामक दलाचे आभार व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *