*महात्मा फुले विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी* गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

Khozmaster
1 Min Read

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती *शिक्षक दिन* म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव श्री. आत्मारामजी तिडके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. ए. तिडके, पर्यवेक्षक श्री. एस. एस. गोसावी होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी थोर नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेचे संस्थापक सचिव श्री. आत्मारामजी तिडके यांनी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपाई पर्यंत शाळेचे कामकाज सांभाळून उस्फूर्तपणे *स्वयंशासन दिन* साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी शाळेचे अध्यापक श्री. बी.बी. भाकड यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. ए. आंधळे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री. एस. एस. जोशी यांनी मानले.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *