हृदयद्रावक! पतीच्या खांद्यावर डोकं ठेवताच कोसळल्या, मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीतच आईला हार्ट अटॅक

Khozmaster
2 Min Read

वलसाड: गेल्या काही काळापासून हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही आता हार्ट अटॅक येत आहेत. जे अत्यंत चिंताजनक आहे. दोन दिवसांपूर्वी एका तिसऱ्या वर्गातील मुलीला शाळेत हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. तर त्यापूर्वी एका महिलेला फोनवर बोलता बोलता हृदयविकाराचा धक्का आला. आता एका महिलेला तिच्याच मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत हृदयविकाराचा धक्का आला आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही वेदनादायक घटना गुजरातमधील वलसाड येथे घडली आहे.

मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आईला हार्ट अटॅक, जागीच मृत्यू

येथे मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आईला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे कुटुंब त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना हे घडलं.

हसत्या-खेळत्या कुटुंबावर शोककळा, क्षणात होत्याचं नव्हतं

या पार्टीत पाहुण्यांची वर्दळ दिसत आहे. बर्थडे बॉय गौरिकची आई यामिनीबेन आणि वडील हे मंचावर होते. दरम्यान, यामिनीबेन यांनी गौरिकला एका महिलेकडे दिले. त्यानंतर त्या दोन पावलं चालल्या आणि थेट खाली कोसळल्या. त्यांना काय झालं हे कोणालाच कळेना. उपस्थित नातेवाईकांनी तात्काळ त्यांना उचलून रुग्णालयात नेले. पण, तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी यामिनीबेन यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर हसत-खेळतं कुटुंब क्षणात दु:ख सागरात बुडालं.

पतीच्या खांद्यावर डोकं ठेवलं अन् खाली कोसळल्या

या घटनेचं जे सीसीटीव्ही फुटेड समोर आलं आहे, त्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक डीजेवर नाचत असल्याचे दिसत आहे. बर्थडे बॉय गौरिकची आई यामिनीबेन आणि वडील स्टेजवर पार्टी एन्जॉय करत होते. त्यानंतर यामिनीबेन यांनी पतीच्या खांद्यावर डोके ठेवले आणि त्या थेट स्टेजवरून खाली पडल्या. त्यामुळे सगळे घाबरले. त्यांनी यामीनीबेन यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे.

0 9 3 8 9 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *