पहूर येथे तार चोरीच्या गुन्ह्यातील ३ गुन्हेगार;सपोनि सचिन सानप यांनी केले जेरबंद

Khozmaster
1 Min Read
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 
पहूर , ता . जामनेर ÷( ता . ३ ) परिसरातील शेत शिवारात  वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर  पोलिसांनी आज तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली .
गेल्या १५ दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे
 या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे , पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक स्थापन करण्यात आले आहे .
 गस्तीवर असताना फिरोज खाटीक ,  इरफान शेख ,  फातिम शेख ( रा . मदनी नगर  , जामनेर  ) हे संशयास्पद रित्या आढळून आले . यांना अटक करून त्यांच्या जवळील साडेसात हजार रुपयांची रोकड व लोखंडी टॅमी जप्त केली . याप्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . गस्तीपथकात दीपक सुरवाडे  , विनोद पाटील , ज्ञानेश्वर ठाकरे , राहूल पाटील , अमोल पाटील  , गोपाळ गायकवाड यांचा समावेश होता .
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *