वासुदेव महाराज संस्थेच्यावतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

आकोट:- तालुका प्रतिनिधी 

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट यांच्या वतीने आयोजित सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन रविवार, दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री ह.भ.प. वासुदेवराव महल्ले हे भूषविणार आहेत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सुनिल बाबुराव चव्हाण, मा. श्री. अमोल माळवे (पोलीस निरीक्षक, आकोट शहर), श्री. ह.भ.प. वासुदेव महाराज खोले, मा. अनिकेत रामरतन पुंडकर, मा. आमदार श्री. वसंतराव खोटरे श्री. ह.भ.प. श्रीधर महाराज अवारे, डॉ. दिलीपराव काळे (संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख, अमरावती विद्यापीठ), प्रा. प्रभाकर ठाकरे, श्री.ह.भ.प. रमेश महाराज अवारे यांची विशेष उपस्थिती लाभनार आहे. तसेच कार्यक्रमास मा. श्री. गजाननराव हरणे, प्रा. सुरेश डोंगरे, श्री.ह.भ.प. श्रीधर महाराज पातोंड, (वरूड-जऊळका), प्रा प्रल्हादराव तराळे इंजी. बाळकृष्ण आमले श्री.ह.भ.प. ज्ञानेशप्रसाद पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे.या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्म, नैतिक मूल्य शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, वक्तृत्व, संस्कार वर्ग योग, यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी व अध्यात्मिक वाचनातून जीवनमूल्यांची जाणीव करून देण्याचा संस्थेचा उद्देश आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने आयोजित हा उपक्रम संपूर्ण परिसरात प्रेरणादायी ठरत असून, संस्थेच्या कार्याबद्दल सर्वत्र गौरवोद्गार काढले जात आहे. वरील कार्यक्रमाला पालक, नागरिकांनी व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग होण्याचे आवाहन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *