अकोलखेड येथे नेहरू विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Khozmaster
2 Min Read

अकोलखेड (ता. अकोट) :
तालुक्यातील नेहरू विद्यालय, अकोलखेड येथे इ.स. २००५ मध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेत एकत्र जमले आणि शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण तळोकार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. जुनगरे उपस्थित होते. यावेळी शिक्षक राठोड, पिवाल व देशमुख हे देखील मंचावर उपस्थित होते.

स्नेहमेळाव्याच्या दरम्यान सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत शालेय दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. काही माजी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आल्या होत्या. जुन्या मैत्रीचे बंध पुन्हा जुळताना, गुरूजनांप्रती आदरभाव व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते.

या प्रसंगी जया कावरे, रोशनी जांभळे, हर्षा नाठे, ममता दिवेकर, रोशनी रदे, राधिका महले, मीना खंडारे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर तळोकार, राजकुमार टिपले, निलेश ठोंबरे, अनिल जवंजाळ, प्रवीण कंटाळे, पवन रंदे, नितीन तळोकार, दीपक गणोरकर, सुनील मुंडोकार, गणेश बोचे, तुषार फुसे, सुनील चोंडेकर, गणेश सावरकर, जगदीश सावरकर, मुन्ना सावरकर, सचिन केदार, सुदेश लोखंडे, निखिल लांडे व सूरज गणभोज यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमल येऊल व सचिन रंदे यांनी केले. प्रास्ताविक तुषार पिंप्राळे यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल टवलारे यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी, शिक्षकांचा सन्मान व आनंदी वातावरणात स्नेहमेळाव्याचा समारोप करण्यात आला

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *