ट्रम्प प्रशासनाचा व्हिसाबाबत आणखी कडक निर्णय; भारतावर काय परिणाम होणार?

Khozmaster
1 Min Read

विशेष प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर नियंत्रण आणि अंतर्गत सुरक्षा अधिक कडक करण्याच्या उद्देशाने व्हिसा धोरणात आणखी कठोर बदल जाहीर केले आहेत. यापूर्वी H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली होती. आता या निर्णयांच्या पुढील टप्प्यात ग्रीन कार्डधारकांवरही अधिक कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांनुसार, अमेरिकन नागरिक नसलेल्या ग्रीन कार्डधारकांची अमेरिका प्रवेश व निर्गमनावेळी सविस्तर नोंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि फिंगरप्रिंट तपासणीचा वापर केला जाणार आहे. सुमारे १९ देशांतील ग्रीन कार्डधारकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, यामध्ये भारताचे शेजारी देश म्यानमार आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

याशिवाय, व्हिसा देताना अर्जदारांच्या सोशल मीडिया खात्यांचीही कडक तपासणी करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अमेरिकेविरोधी मजकूर आढळल्यास व्हिसा नाकारला जाण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेत जन्म देऊन मुलांना नागरिकत्व मिळवून देण्याच्या उद्देशाने येणाऱ्या गर्भवती महिलांच्या व्हिसावरही निर्बंध घालण्यात येणार आहेत.

भारतावर परिणाम काय?
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय ग्रीन कार्डधारक वास्तव्यास आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, या नव्या धोरणांचा थेट मोठा परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता कमी आहे. तथापि, नियम अधिक कठोर झाल्यामुळे अमेरिकेतून बाहेर पडताना आणि पुन्हा प्रवेश करताना प्रक्रिया अधिक वेळखाऊ व तपासणीप्रधान होणार आहे. प्रत्येक प्रवासावेळी कडक चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *