जालना –
राजकारणातील कार्यकर्त्यांची भूमिका आणि मानसिकता काळानुसार मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पूर्वी कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आज हळूहळू सुविधाकेंद्रित होत चालला आहे.
पूर्वीच्या काळात कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने, सायकलवर शिदोरी बांधून घराघरांत जाऊन उमेदवारांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवत होते. मात्र कालांतराने हीच कार्यकर्ता संस्कृती बदलत गेली. सायकलनंतर दुचाकी आणि आता चारचाकी वाहनाशिवाय प्रचारच होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आजच्या घडीला प्रचारासाठी वाहन, इंधन, भोजन यांसह सर्व सुविधा उमेदवार किंवा पक्षाकडून अपेक्षित धरल्या जात असल्याचे दिसून येते. यासोबतच कार्यकर्त्यांचीही एक प्रकारची वर्गवारी झाली असून, काही केवळ घोषणा देणारे, काही रॅलीपुरते सक्रिय राहणारे, तर काही वाहनातून प्रचार करणारे ‘हायटेक’ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
या सगळ्या प्रक्रियेत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मात्र मोजकेच उरले असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. बदलती कार्यकर्ता संस्कृती ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब ठरत असून, मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख कार्यकर्त्यांची गरज आज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
आधुनिक राजकारणात कार्यकर्त्यांची बदलती संस्कृती
0
9
4
5
4
1
Users Today : 6
Leave a comment