मेहकर येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचे निवारण

Khozmaster
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आज (दि. २९ डिसेंबर) जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांसह माता-भगिनींनी भेट दिली. यावेळी नागरिकांच्या वैयक्तिक व स्थानिक स्वरूपाच्या अडचणी, तक्रारी आणि विविध प्रश्न ऐकून घेण्यात आले.
नागरिकांनी मांडलेल्या समस्यांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून तत्पर प्रतिसाद देणे हीच खरी लोकसेवा असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील, असे आश्वासन देण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

0 9 2 9 2 0
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *