LPG वरील सबसिडीवर मोठा बदल? अमेरिकेकडून गॅस आयात, घरगुती सिलेंडर महाग होण्याची शक्यता

Khozmaster
1 Min Read

नवी दिल्ली :-

केंद्र सरकार एलपीजी (LPG) सबसिडीवर नव्याने विचार करत असल्याचे संकेत समोर आले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी अमेरिकेकडून एलपीजी आयात करण्यासाठी वार्षिक करार केला असून, या नवीन बदलामुळे घरगुती गॅस सिलेंडर महाग होऊ शकतो.

सध्या एलपीजी सबसिडीची गणना सौदी अरबच्या क्रूड किंमतीवर (CP) आधारित केली जाते. मात्र आता अमेरिकेकडून गॅस आयात करताना, शिपिंगचा खर्च आणि अटलँटिक महासागर ओलांडण्यासाठी लागणारा खर्चही समाविष्ट करण्याचा विचार आहे. अमेरिकेकडून शिपिंगचा खर्च सौदी अरबच्या तुलनेत चारपट अधिक असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने अमेरिकेकडून 2.2 दशलक्ष मेट्रिक टन एलपीजी आयातीसाठी करार केला आहे, जो वर्ष 2026 साठी आहे. या नवीन फॉर्म्युल्यामुळे एलपीजी सबसिडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या दिल्लीत 14.2 किलो घरगुती सिलेंडरची किंमत 853 रुपये आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 रुपयांची सवलत मिळते. व्यावसायिक 19 किलो सिलेंडरची किंमत 1580.50 रुपये आहे. सरकारने सबसिडी कमी अथवा हटवण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सबसिडी बदलली तर ग्राहकांच्या किचन बजेटवर मोठा परिणाम होऊ शकतो.

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *