मेहकर : पतीने पत्नी आणि मुलाला ठार मारले, माहेरकडीलांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली

Khozmaster
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी ;

येथील शिक्षक कॉलनीत 29 डिसेंबरच्या रात्री थरारक घटना घडली. राहुल म्हस्के (वय 35) याने निवांत झोपलेल्या पत्नी रूपाली (वय 28) आणि चार वर्षीय मुलगा रियांश यांना कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्याची घटना उघड झाली. या घटनेनंतर मेहकर पोलिसांनी राहुलला तातडीने अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
31 डिसेंबरच्या दुपारी मृतक रूपालीच्या माहेरकडील नातेवाईक मेहकर पोलिस ठाण्यात धाव घेत उपस्थित राहिले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, “आमच्या मुलीवर केवळ तिच्या पतीनेच नाही, तर सासू-सासरे आणि काही इतर व्यक्तींचाही सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्यांवरही त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी.”
माहेरकडील मोळा येथील नातेवाईकांनी अंदाजे तीन तास पोलिस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. पोलिस ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी जमावाला समजावून सांगितले की, सध्या आरोपी पतीवर अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. तपासादरम्यान जर अन्य आरोपी निष्पन्न झाले, तर त्यांच्याविरुद्धही त्वरित कारवाई केली जाईल.
ठाणेदारांनी आश्वासन दिल्यानंतर जमाव साडेतीन वाजता पोलिस स्टेशनहून निघाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे आणि आवश्यकतेनुसार पुढील कारवाई केली जाईल.”
मेहकर पोलीस ठाण्यातून तपास अधिकारी व्यंकटेश आलेवार यांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *