वांजोळा ग्रामपंचायतीत माहिती देण्यास टाळाटाळ; अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाची तक्रार

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा..

मंठा तालुक्यातील वांजोळा ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असून संबंधित अधिकारी व प्रशासकांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रमोद प्रकाशराव चव्हाळ व सर्जेराव वसंतराव चव्हाळ यांनी पंचायत समिती मंठा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देत माहिती अधिकार विस्तार अधिकारी व प्रशासक विजयकुमार पाटील यांच्या गैरवर्तनाबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार ग्रामपंचायतीने इतर कामांची बिले अपलोड केलेली असताना टेंडर डीआरचे बिल मात्र अपलोड न केल्याबाबत माहिती विचारण्यात आली होती. तसेच 14 व 15 वित्त आयोगाशी संबंधित माहिती मागविण्यात आली होती. मात्र, याबाबत स्पष्ट उत्तर देण्याऐवजी विस्तार अधिकाऱ्यांनी उद्धट भाषा वापरल्याचा आरोप अर्जात नमूद आहे.

याशिवाय प्रशासक विजयकुमार पाटील हे दारूच्या नशेत कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आले आहेत. अशा प्रकारामुळे प्रशासनिक शिस्तभंग होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांना माहिती मिळणे हा मूलभूत अधिकार असून माहिती लपविणे किंवा अपूर्ण माहिती देणे हा कायद्याचा स्पष्ट भंग आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

0 9 4 5 4 1
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *