वाशिम : “नातं रक्ताचं” लघुचित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’

KHOZ MASTER
1 Min Read

वाशिम प्रतिनिधी :

Buldhana Film Society आणि Wadekar Films यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये रक्तदानावर आधारित संतोष बायस्कार तहऱ्हाळकर यांच्या राजनंदिनी फिल्म्स प्रस्तुत “नातं रक्ताचं” या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेअभिनेते व नाट्यकलावंत Subhash Bavaskar होते. प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेते Mohan Kale, संपादक रफिक कुरेशी, नाट्यदिग्दर्शक व कलावंत गणेश बंगाळे, गणेश तांगडे तसेच वाडेकर फिल्म्सचे संस्थापक व लेखक-दिग्दर्शक भास्कर वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटाची वैशिष्ट्ये
कथा, पटकथा, निर्माता-दिग्दर्शक: संतोष बायस्कार तहऱ्हाळकर
संवाद: डॉ. रावसाहेब काळे
कार्यकारी निर्माती: नंदिनी संतोष बायस्कार
या लघुचित्रपटात विदर्भातील कलावंत राम आपोतीकर, किरण गोल्डे, सुहास वैद्य, सुनीता धुरंधर, हर्षद बोदडे, हर्षा राऊत, राहुल गिते, गौरव दळवी, विद्या खाडे, भाऊराव मोकळे, विद्या वानखडे, संतोषकुमार ताले, सुनील केंगारकर यांच्या भूमिका असून विशेष प्रमुख भूमिका संतोष बायस्कार तहऱ्हाळकर यांनी साकारली आहे.
यापूर्वी पुणे येथे आयोजित आरोग्य चित्रपट महोत्सवात देश-विदेशातून आलेल्या लघुचित्रपटांमधून “नातं रक्ताचं” ची निवड झाली होती, ही उल्लेखनीय बाब आहे.
निर्माता-दिग्दर्शक संतोष बायस्कार तहऱ्हाळकर यांनी सांगितले की, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची ‘ऑडिशन’साठी परवानगी घेतल्यानंतर लवकरच एका नवीन शैक्षणिक लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
या यशाबद्दल सर्व स्तरांतून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन होत आहे.

0 9 3 7 0 6
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *