मध्य पूर्वेत युद्धाचे १० दिवस :
अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे.
युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या मते, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर इराणने आपला नवीन सर्वोच्च नेता निवडला आहे.
ट्रम्प नाराज
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्त्रायलवर प्रचंड संतापले आहेत. युद्ध सुरू असताना इस्त्रायलने इराणमधील तेल साठ्यांवर हल्ला केला, ज्यामुळे अमेरिकेनं जोरदार नाराजी व्यक्त केली.
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, “इस्त्रायलने एवढी टोकाची भूमिका घेणे चुकीचे आहे; तेलाच्या साठ्यांवर हल्ला झाल्यास त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो.”
अमेरिका-इस्त्रायलचे तणावाचे क्षण
रिपोर्टनुसार, इस्त्रायलकडून तेल डेपोवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेनं स्पष्ट केले की, “आम्हाला इतक्या भीषण हल्ल्याची अपेक्षा नव्हती; हे हल्ले चुकीचे आहेत.” या प्रतिक्रियेने इस्त्रायलमध्ये आश्चर्य निर्माण झाले असून, आता अमेरिका आणि इस्त्रायल आमने-सामने उभे राहिल्याचे चित्र दिसते.
युद्धाचा दहावा दिवस
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये तीनही देशांनाही मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसानीचा फटका इराणला बसला आहे. मात्र, इस्त्रायलने इराणच्या तेल साठ्यांवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेची नाराजी वाढली आहे.
Users Today : 42