यवतमाळ : कोंबडी चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत

KHOZ MASTER
1 Min Read

यवतमाळ प्रतिनिधी :

तालुक्यातील ईचोरी येथे चोरीच्या संशयातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव किशोर राजू कुंभेकर असे असून आरोपी किसन शामा घोटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोंबडी चोरीच्या संशयातून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किसन घोटकर याच्याकडे कोंबड्या असून रविवारी सकाळी त्याचा एक कोंबडा दिसेनासा झाला. त्याच वेळी घराबाहेर किशोर कुंभेकर आपल्या मित्रासोबत उभा होता.
कोंबडी चोरी केल्याचा संशय आल्याने घोटकर आणि किशोर यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
लाकडी काठीने मारहाण
वादाच्या वेळी आरोपीने लाकडी काठीने मारहाण केल्यामुळे किशोर कुंभेकर गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो घरी गेल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
मृताचे वडील राजू कुंभेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्रीच आरोपीला अटक केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास लाडखेड पोलिसांकडून सुरू आहे.

0 9 3 9 3 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *