मुंबई – गुरुवार, 12 मार्च 2026:
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे आणि त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर झपाट्याने जाणवू लागला आहे. आज तेलाच्या किंमतीत 9.3% वाढ झाली असून, ब्रेंट क्रूडची किंमत $100.50 प्रति बॅरल वर पोहोचली आहे.
काल स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये तेल टँकरवर हल्ला झाला, ज्यामुळे तेल व एलपीजी पुरवठा बाधित होण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा उभारणी झाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 115 डॉलर पर्यंत पोहोचली होती, त्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपेल असा आश्वासन दिल्यामुळे किंमत 85 डॉलर पर्यंत खाली आली होती. मात्र आज सकाळी पुन्हा 100 डॉलरच्या पुढे पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
Straits of Hormuz हल्ल्याचा धोका
इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये हल्ले सुरु असून, या मार्गावरुन जहाजं चालवण्याचा धोका वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझची रुंदी 33 किलोमीटर असून, ऑपरेशनल हिस्सा 11 किलोमीटर आहे. या मार्गावरून तेलवाहतूक करणारे जहाजं सुरक्षितपणे चालवणे आता आव्हानात्मक ठरले आहे. तसेच इराणकडून आखाती देशातील तेल रिफायनरीजवर हल्ले सुरु असल्याने अनेक देशांनी तेल उत्पादन बंद केले आहे.
आंतरराष्ट्रीय उपाययोजना
-
सरकार आणि ऊर्जा कंपन्या आपसात समन्वय साधून तेल आणि LPG गॅस पुरवठा सुनिश्चित करत आहेत.
-
अमेरिकेच्या ऊर्जा विभागानुसार, पुढच्या आठवड्यात 172 मिलियन क्रूड ऑईल स्ट्रॅटजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून बाजारात आणले जाणार आहे.
-
यामुळे तेलाच्या किंमती भडकू नयेत, हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
भारतासाठी परिणाम
-
भारतासह सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तेल पुरवठा धोका आणि किंमती वाढीचा तणाव निर्माण झाला आहे.
-
हा संघर्ष थांबला नाही आणि आगामी काळात तेल आणि एलपीजीच्या किंमतीत चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे.
Users Today : 22