मुंबई,
दिग्दर्शक Aditya Dhar दिग्दर्शित आणि Ranveer Singh अभिनित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत मोठं यश मिळवलं आहे. जगभरातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत असताना, रणवीरची पत्नी व अभिनेत्री दीपिका पादुकोण मात्र अद्याप या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर गप्प असल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात सुमारे १३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २’ म्हणजेच ‘धुरंधर : द रिव्हेंज’नेही प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार Rajinikanth, Allu Arjun, Mahesh Babu, तसेच Anupam Kher, Kangana Ranaut, Vijay Deverakonda आणि Jr. NTR यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रणवीर सिंह आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.
बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही रणवीरच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. Preity Zinta, Alia Bhatt, Kartik Aaryan, Shanaya Kapoor, Ananya Panday आणि Sidharth Malhotra यांनीही सोशल मीडियावर रणवीरच्या कामगिरीचं अभिनंदन केलं आहे.
मात्र या सर्वांमध्ये दीपिका पादुकोणने ‘धुरंधर २’च्या यशाबद्दल कोणतीही पोस्ट न केल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणवीरच्या कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा चित्रपट मानला जात असताना, पत्नीने याबद्दल मौन का बाळगलं आहे, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, केवळ दीपिकाच नव्हे तर Amitabh Bachchan, Shah Rukh Khan आणि Salman Khan यांसारख्या मोठ्या बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटाबाबत सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर काही जणांनी ‘धुरंधर’ हा प्रचारकी किंवा प्रोपेगेंडा प्रकारचा चित्रपट असल्याची टीका केली आहे. त्यामुळे काही कलाकार अशा चित्रपटाचं उघडपणे कौतुक करण्यापासून दूर राहत असावेत, असा अंदाजही काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तथापि, या चर्चांदरम्यान रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये लंच डेटला एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्यात कोणताही दुरावा नसल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दीपिकाच्या मौनाबाबतची चर्चा ही सध्या सोशल मीडियापुरतीच मर्यादित असल्याचं चित्र दिसत आहे.
Users Today : 35