भोंदू खरात प्रकरणावर राज्यभर संताप

KHOZ MASTER
1 Min Read

नागपूर / महाराष्ट्र

स्वयंघोषित ज्योतिषी व “कॅप्टन” म्हणवणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधातील आरोपांची व्याप्ती वाढत आहे. त्याच्यावर अनेक महिलांवर लैंगिक शोषण, रेकॉर्डिंगआर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाचा एसआयटीक़ून तपास सुरू आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • प्रकरणाने महाराष्ट्रात तसेच देशभर संतापाची लाट निर्माण केली आहे.
  • भाजपचे नेते सुधीरर मुनगंटीवार यांनी खरातला चौकात उभं करून “एकेक सुई टोचून शिक्षा” देण्याची संतप्त मागणी केली.
  • विरोधी पक्ष तसेच संघटनांनीही खरातला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
  • शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख मनोहरराव भिडे आणि माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देखील कठोर कृतीची मागणी केली.
  • रुपाली चाकणकर यांचा राजीनामा योग्य असल्याचे मानले गेले, परंतु अंजली दमानिया यांनी सांगितले की न्याय मिळवण्यासाठी योग्य मार्ग कायद्यातून जाण्याचा असावा.

सामाजिक प्रतिक्रिया:

  • प्रकरणामुळे सामाजिक संताप व राजकीय चर्चा गाजत आहे.
  • महिलांना न्याय मिळावा, अशा दृष्टीने एफआयआर आणि योग्य कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.
0 9 4 8 0 2
Users Today : 42
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *