कुही –
तालुक्यातील इंधन पुरवठा व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सात पेट्रोलपंपांपैकी चार पंप बंद असल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड अडचण निर्माण झाली आहे.
बंद पंप: पचखेड़ी व मांढळ परिसरातील तीन पंप २६ मार्चपासून बंद आहेत. मुख्यालयी भारत पेट्रोलपंपही बंद असल्याने संपूर्ण तालुक्यात इंधनटंचाई.
शेतकरी त्रासात: सध्या शेतीकामांचा हंगाम सुरू आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, जनरेटर, फवारणी यंत्रासाठी डिझेल उपलब्ध न झाल्याने शेतीकामे ठप्प.
ग्रामीण जनतेवर परिणाम: चार पंप ग्रामीण भागात असल्याने ग्रामीण नागरिकांचा मुख्य आधार बंद पडल्यानं परिस्थिती बिकट.
व्यावसायिक त्रास: दूध, भाजीपाला, मालवाहतूक करणाऱ्यांनाही इंधन न मिळाल्यामुळे कामकाज प्रभावित.
नागरिकांची मागणी: तातडीने पेट्रोलपंप सुरू करून इंधनटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी
Users Today : 47