जळगाव –
सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढउतार सुरू असून आज सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना धक्का बसला आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिनाभरापासून घसरण होत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरात गेल्या सहा दिवसांत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. अवघ्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ११ हजार ५०० रुपयांची वाढ झाली असून पुन्हा एकदा सोन्याने दीड लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे.
आज २८ मार्च रोजी सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह प्रति तोळा १ लाख ५० हजार ३८० रुपये इतका झाला आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून ३ हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो २ लाख ३९ हजार ९९० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या दरात अचानक वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Users Today : 47