पोलीस भरतीत धावताना चिंचोलीच्या तरुणाचा मृत्यू

KHOZ MASTER
2 Min Read

Shivajinagar Police Headquarters Ground येथे धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी घटना

देऊळगाव राजा –
पोलीस भरती प्रक्रियेतील धावण्याच्या चाचणीदरम्यान चिंचोली बुरकुल येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी पुणे येथील Shivajinagar Police Headquarters Ground येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून तो देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथील रहिवासी होता. पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करीत होता.

पुणे शहर पोलीस दलासाठी भरतीची जाहिरात निघाल्यानंतर पुरुषोत्तमने अर्ज केला होता. तो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला होता. शनिवारी सकाळी भरती प्रक्रियेअंतर्गत १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना त्याने दोन फेऱ्या पूर्ण केल्या. मात्र तिसऱ्या फेरीदरम्यान त्याला अचानक अपस्माराचा झटका (फिट) आल्याने तो धावत असतानाच मैदानावर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच मैदानावर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. उपस्थित वैद्यकीय पथकाने प्राथमिक तपासणी करून त्याला तातडीने Sassoon General Hospital येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे

पुरुषोत्तमच्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे वडील भीमराव बुरकुल यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पुरुषोत्तमवर आली होती. मेहनती व शांत स्वभावाच्या पुरुषोत्तमने पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्याचा अकाली मृत्यू झाल्याने हे स्वप्न अधुरेच राहिले.

0 9 4 9 5 5
Users Today : 127
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *