आयपीएल 2026 : Mahendra Singh Dhoni च्या चाहत्यांना मोठा धक्का; स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत संभ्रम 🏏

KHOZ MASTER
2 Min Read

मुंबई :

Indian Premier League 2026 हंगामाच्या सुरुवातीलाच Mahendra Singh Dhoni च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याचे स्पष्ट झाले असून, तो संपूर्ण स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतही आता संभ्रम निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Chennai Super Kings चा कर्णधार असलेला धोनी सध्या दुखापतीवर उपचार घेत आहे. सुरुवातीला तो केवळ दोन आठवडे संघाबाहेर राहील असे सांगितले जात होते. मात्र ताज्या मीडिया रिपोर्टनुसार त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तो मैदानाबाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे साखळी फेरीतील जवळपास सहा सामने तो खेळू शकणार नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना Rajasthan Royals विरुद्ध होणार आहे. संघ राजस्थानमध्ये पोहोचला असला तरी धोनी अजूनही चेन्नईमध्ये उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो पहिल्या काही सामन्यांमध्ये डगआउटमध्येही दिसणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा Ruturaj Gaikwad सांभाळणार असून, विकेटकीपरची जबाबदारी Sanju Samson कडे असणार आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स संघ मैदानात Suresh Raina आणि धोनी या दोघांशिवाय उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2021 मध्ये विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मागील हंगामात तर संघ गुणतालिकेत तळाशी राहिला होता.

यंदा संघात संजू सॅमसनचा समावेश झाल्यामुळे संघ अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्स कशी कामगिरी करते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. 👀🏏

0 9 4 9 5 7
Users Today : 129
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *