एमआयडीसीत १ लाख ४२ हजारांची घरफोडी*

KHOZ MASTER
1 Min Read

नागपूर

नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण *१ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास* केल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली.

अकरम मोहम्मद खान (वय ४७, रा. प्लॉट क्रमांक ४९, महाजनवाडी, एमआयडीसी) हे ३ एप्रिल रोजी सकाळी कुटुंबासह घराला कुलूप लावून वर्धा जिल्ह्यातील शिरपूर येथे साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

४ एप्रिल रोजी सकाळी ते घरी परतले असता मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडण्यात आले असल्याचे आढळले.

चोरट्याने कपाटातील *७२ हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने* असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले.

याप्रकरणी अकरम खान यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *