बोगस बांधकाम करून पैसा लाटण्याचा गोरख धंदा सुरू
सोयगाव प्रतिनिधी अलका चव्हाण
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शासनाच्या पैशातून सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामात मोठा सर्रास पणे भ्रष्टाचार सुरु आहे. हा भ्रष्टाचाराचा तांडव सार्वजनिक बांधकाम विभागा चे इंजिनियर नितीन राठोड आणि या कामाचे ठेकेदार यांच्या मिलीभगतीने हे काम पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने सुरू असून, सरकारी इमारत बनण्याआधीच धोकादायक बनण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सावळदबारा येथे नव्या तलाठी कार्यालयाचे बांधकाम सध्या सुरू आहे. मात्र हे बांधकाम नित्कृष्ट दर्जाच्या साहित्याने होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. माती मिश्रित बोगस कच बोगस विटांमध्ये मोठी काटछाट झाल्याचं दिसून येत असून, पाया वरच्या वर असून बांधकामाची गुणवत्ता शून्य असल्याचं चित्र आहे. अधिकारी-ठेकेदार गायब, मजूर भरवशावर काम.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कामाचे अभियंता आणि ठेकेदार साईटवर फिरकतही नाहीत. दिवसभर मजूर आपल्या मनाने काम करत असून, अभियंता आणि ठेकेदार मात्र घरी झोपा घेत आहेत. कामाची कोणतीही देखरेख नसल्याने मजूर हव्या तशा पद्धतीने काम करत आहेत. नियमांचा बोजवारा
सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम साईटवर कुठेही कामाचा फलक लावलेला नाही शासकीय कामात कामाची किंमत, कालमर्यादा, ठेकेदाराचे नाव आणि अभियंत्याची माहिती असलेला फलक लावणं बंधनकारक असतं. पण इथे हा नियम सर्रास पायदळी तुडवला जात आहे. यावरूनच या कामात किती मोठी अनियमितता सुरू आहे हे स्पष्ट होतं.
या कामाची चौकशी झाली नाही तर उद्या ही इमारत कोसळल्यावर कोण जबाबदार?” असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासकीय इमारतीचं बांधकाम म्हणजे जनतेच्या विश्वासाचा पाया असतो. पण सावळदबाऱ्यात हा पायाच कमजोर केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच डोळे उघडून कारवाई न केल्यास हा भ्रष्टाचाराचा डोंगर उद्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. या कामाचे काम चुकार अभियंता.. आणी गुत्तेदार यांच्या वरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थान कडून केली जात आहे
Users Today : 22