पुणे —
जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांच्या सलग घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संताप निर्माण झाला आहे. नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, चाकणजवळील बिरदवडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी घरात कोणी नसल्याने काकाच्या घरी जात होती. यावेळी ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने घराच्या परिसरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर चाकण पोलिसांनी त्वरीत कारवाई करत 32 वर्षीय आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नसरापूर प्रकरणाने आधीच खळबळ
दरम्यान, नसरापूर येथे काही दिवसांपूर्वी 65 वर्षीय आरोपीने 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीने मुलीला गोठ्यात नेऊन अत्याचार केला आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणीही आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सलग घडलेल्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांकडून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य क
Users Today : 28